जीवन तर सगळेच जगतात.पण जगण्यातला खरा आनंद तुम्हाला मिळतो का?
खरंतर तुम्ही शोधता का?
जीवन कसे जगावे.. हे शिकवणारे खूप भेटतील पण ते कसे उलगडावे हे सांगणारे फार थोडे, कदाचित नाहीच.
निरोगी शरीरासोबत निरोगी मन सुद्धा असायला हवं आणि म्हणूंनच 'पेराल तसे उगवेल' याच्यासाठी काय पेरायला हवं, पैसा लागतोच जगायला पण त्याची सांगड घालून मनासारखं जगायला, नात्यांमधले बदल स्विकारत, स्वतःला बदलायला, खऱ्या अर्थाने जगायला हे पुस्तक नक्की शिकवेल.
स्वतःचा शोध घेऊन, स्वतःवरती प्रेम करायला, 'हू केअर्स' चा मंत्र वापरून निर्णय घ्यायला आणि घेतले त्या निर्णयाला तडीस नेण्यासाठी स्वतःच स्वतःला आधार द्यायला हे पुस्तक नक्की शिकवेल.
मग तयार आहात ना जीवनातील प्रत्येक क्षण अनुभवायला. "चला जगूया."